‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून दर महिन्याला ₹१५०० मिळणाऱ्या महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी आता e-KYC करणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून ही माहिती देण्यात आली असून, सर्व पात्र महिलांनी पुढील दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
e-KYC करण्याची गरज का आहे?
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की, योजनेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांना वेळेवर लाभ मिळण्यासाठी e-KYC करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यास भविष्यातील इतर सरकारी योजनांचा लाभ घेतानाही मदत होईल.
अशी करा ‘e-KYC’ प्रक्रिया पूर्ण
तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
- अधिकृत वेबसाईटवर जा: सर्वात आधी, तुम्हाला
https://ladakibahin.maharashtra.gov.in
या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. - पर्याय निवडा: वेबसाईटच्या मुख्य पानावर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा’ हा पर्याय निवडा.
- माहिती भरा: आता नवीन पेज उघडेल. तिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
- OTP टाका: आधार प्रमाणीकरणासाठी संमती दिल्यानंतर, तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP (वन-टाइम पासवर्ड) येईल. तो OTP भरून प्रक्रिया पूर्ण करा.
या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही दोन महिन्यांच्या आत तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता, याची अंतिम मुदत १८ सप्टेंबर २०२५ पासून पुढील दोन महिने आहे. त्यामुळे, लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा.