Gold Price Today: अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण समितीची बैठक आणि टॅरिफबाबतच्या घडामोडींमुळे भारतीय सराफा आणि वायदे बाजारात सोने-चांदीच्या किंमती दबावाखाली आल्या आहेत.
- सोने (ऑक्टोबर वायदा): वायदे बाजारात सोन्याचा भाव 1,09,705 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, यात 0.41% घट झाली.
- चांदी (डिसेंबर वायदा): चांदीचा भाव 1,27,304 रुपये प्रति किलो होता, यात 1.18% घट झाली.
विविध कॅरेट सोन्याचा भाव (Goodreturns.in नुसार)
- 24 कॅरेट सोने: 11,186 रुपये प्रति ग्रॅम (22 रुपयांची घसरण).
- 22 कॅरेट सोने: 10,255 रुपये प्रति ग्रॅम (80 रुपयांची घसरण).
IBJA नुसार आजचे भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीचे भाव खालीलप्रमाणे आहेत:
- 24 कॅरेट सोने: 1,09,970 रुपये प्रति 10 ग्रॅम.
- 22 कॅरेट सोने: 1,00,730 रुपये प्रति 10 ग्रॅम.
- 18 कॅरेट सोने: 82,480 रुपये प्रति 10 ग्रॅम.
- 14 कॅरेट सोने: 64,330 रुपये प्रति 10 ग्रॅम.
- चांदी: 1,29,300 रुपये प्रति किलो.
बातम्यानुसार, सोन्याची किंमत कमी झाल्यामुळे ग्राहकांची खरेदी वाढू शकते असा अंदाज आहे.