Farmer Crop Insurance list : महाराष्ट्र सरकारने पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मोठी मदत जाहीर केली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ आणि जून २०२५ या काळात झालेल्या नुकसानीसाठी ही भरपाई दिली जाईल. या संदर्भात, सप्ऑटेंबर गस्ट २०२५ रोजी तीन स्वतंत्र शासन निर्णय (GR) जारी करण्यात आले आहेत. यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या जिल्ह्यांना मिळाली नुकसान भरपाई
सरकारने जाहीर केलेल्या मदतीमध्ये दोन टप्प्यांत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे.
१. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मधील नुकसान भरपाई:
- धाराशिव: ₹२६१.४७ कोटी, ३,२८,४७९ शेतकऱ्यांसाठी मंजूर.
- छत्रपती संभाजीनगर: ₹६.६५ कोटी, ७,५८४ शेतकऱ्यांसाठी मंजूर.
- धुळे: ₹४ हजार, एका शेतकऱ्यासाठी मंजूर.
२. जून २०२५ मधील नुकसान भरपाई:
- अमरावती विभाग (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम): एकूण ₹८६.२३ कोटींची मदत जाहीर.
- छत्रपती संभाजीनगर विभाग (छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, बीड): एकूण ₹१४.५४ कोटींची मदत मंजूर.
पुढील प्रक्रिया आणि पैसे कधी मिळणार?
नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी लवकरच जाहीर केली जाईल. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपले ‘केवायसी’ (KYC) पूर्ण करणे आवश्यक आहे.
या निर्णयामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत मिळेल. अधिक माहितीसाठी, तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइट maharashtra.gov.in ला भेट देऊन संबंधित शासन निर्णय पाहू शकता.