Gas Cylinder Price: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईतून थोडा दिलासा मिळाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. १९ किलो वजनाचा व्यावसायिक गॅस सिलिंडर ५१.५० रुपयांनी स्वस्त झाला असून, आजपासून (१० सप्टेंबर) नवे दर लागू झाले आहेत.
प्रमुख शहरांमधील व्यावसायिक सिलिंडरचे दर
या दरवाढीचा थेट फायदा हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्य व्यावसायिकांना होणार आहे. प्रमुख शहरांमधील नवीन दर खालीलप्रमाणे आहेत:
- दिल्ली: १५८० रुपये
- कोलकाता: १३३४.५० रुपये
- मुंबई: १५३१.५० रुपये (आधीचा दर १५८२.५० रुपये होता)
- चेन्नई: १७३८ रुपये
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती जैसे थे
व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत घट झाली असली, तरी सर्वसामान्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून घरगुती सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत.
- मुंबई: ८५२.५० रुपये
- दिल्ली: ८५३ रुपये
- कोलकाता: ८७९ रुपये
- चेन्नई: ८६८ रुपये
दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घट होत आहे. ऑगस्टमध्ये ३३.५० रुपयांनी आणि जुलैमध्ये ५८ रुपयांनी कपात करण्यात आली होती. कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरच्या नवीन किमती ठरवतात.