Maruti Suzuki Cars Price Cut: जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या जीएसटी दरांमधील बदलांमुळे अनेक वाहनांच्या किमती कमी झाल्या आहेत. याचा सर्वात मोठा फायदा मारुती सुझुकीने घेतला असून, त्यांनी त्यांच्या सर्व लोकप्रिय कारच्या किमतीत मोठी कपात जाहीर केली आहे.
किंमत कपातीचं कारण काय?
३ सप्टेंबर २०२५ रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ५६ व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत नवीन जीएसटी रचना जाहीर करण्यात आली. या घोषणेनुसार, छोट्या गाड्यांवरील जीएसटी दर कमी करण्यात आला, ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. या जीएसटी कपातीव्यतिरिक्त, मारुती सुझुकीने बाजारातील आपला हिस्सा वाढवण्यासाठी स्वतःहून अतिरिक्त सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन किमती २२ सप्टेंबरपासून लागू होणार असून, त्या या वर्षाच्या अखेरपर्यंत लागू राहतील.
मारुती सुझुकी कारच्या नव्या किमती
जीएसटी कपात आणि कंपनीच्या सवलतीनंतर, मारुती सुझुकीच्या लोकप्रिय मॉडेल्सच्या किमतीत मोठी घट झाली आहे. खालील यादीत तुम्ही प्रत्येक मॉडेलवरील कपात आणि त्याची नवी सुरुवातीची किंमत पाहू शकता.
- S-Presso: ₹1,29,600 पर्यंत घट. नवी किंमत: ₹3,49,900
- Alto K10: ₹1,07,600 पर्यंत घट. नवी किंमत: ₹3,69,900
- Celerio: ₹6,94,100 पर्यंत घट. नवी किंमत: ₹4,69,900
- Wagon-R: ₹79,600 पर्यंत घट. नवी किंमत: ₹4,98,900
- Ignis: ₹71,300 पर्यंत घट. नवी किंमत: ₹5,35,100
- Swift: ₹84,600 पर्यंत घट. नवी किंमत: ₹5,78,900
- Baleno: ₹86,100 पर्यंत घट. नवी किंमत: ₹5,98,900
- Dzire: ₹87,700 पर्यंत घट. नवी किंमत: ₹6,25,600
- Fronx: ₹1,12,600 पर्यंत घट. नवी किंमत: ₹6,84,900
- Brezza: ₹1,12,700 पर्यंत घट. नवी किंमत: ₹8,25,900
- Grand Vitara: ₹1,07,000 पर्यंत घट. नवी किंमत: ₹10,76,500
- Jimny: ₹51,900 पर्यंत घट. नवी किंमत: ₹12,31,500
- Ertiga: ₹46,400 पर्यंत घट. नवी किंमत: ₹8,80,000
- XL6: ₹52,000 पर्यंत घट. नवी किंमत: ₹11,52,300
- Invicto: ₹61,700 पर्यंत घट. नवी किंमत: ₹24,97,400
- Eeco: ₹68,000 पर्यंत घट. नवी किंमत: ₹5,18,100
इतर गाड्यांवर जीएसटीचा काय परिणाम?
नवीन जीएसटी धोरणाचा केवळ मारुतीवरच नव्हे, तर इतर वाहनांवरही परिणाम झाला आहे.
- लहान गाड्या (४ मीटर पेक्षा कमी): पेट्रोल (१२०० सीसी पर्यंत) आणि डिझेल (१५०० सीसी पर्यंत) इंजिन असलेल्या गाड्यांवर जीएसटी २८% वरून १८% झाला आहे. त्यामुळे त्यांच्या किमती ८-१०% ने कमी होतील.
- लक्झरी कार आणि मोठ्या एसयूव्ही: या गाड्यांवर आता ४०% एकसमान जीएसटी असेल, ज्यामुळे त्यांच्या किमती ३-१०% कमी होऊ शकतात.
- इलेक्ट्रिक वाहने (EVs): इलेक्ट्रिक कारवरील ५% जीएसटी कायम आहे, त्यामुळे त्यांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
- मोटरसायकल: ३५० सीसीपेक्षा कमी इंजिन असलेल्या मोटरसायकल ७-८% स्वस्त होतील, तर ३५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या मोटरसायकल मात्र ₹३०,००० पर्यंत महाग होऊ शकतात.
ही जीएसटी रचना आणि मारुतीची किंमत कपात ग्राहकांसाठी निश्चितच एक चांगली संधी आहे.