Honda Activa and TVS Jupiter price drop: सरकारने वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जीएसटी परिषदेने जाहीर केल्यानुसार, २२ सप्टेंबरपासून देशातील ३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या बाइक्स आणि स्कूटर्सवरचा जीएसटी दर २८% वरून थेट १८% पर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे येत्या सणासुदीच्या हंगामात दुचाकींची खरेदी लक्षणीयरीत्या स्वस्त होणार आहे.
कंपन्यांनी जीएसटी कपातीचा फायदा ग्राहकांना देण्याचे जाहीर केल्यामुळे आता कोणत्या स्कूटर्स किती रुपयांनी स्वस्त होतील, ते पाहूया.
स्कूटर्सच्या अपेक्षित नवीन किमती
जीएसटी दरातील कपातीमुळे बाजारात सर्वाधिक मागणी असलेल्या काही लोकप्रिय स्कूटर्सच्या किमतीत मोठी घट होणार आहे.
- Honda Activa 125: सध्याची किंमत ₹८१,००० वरून ₹७४,२५० पर्यंत खाली येऊ शकते, ज्यामुळे सुमारे ₹६,७५० ची बचत होईल.
- TVS Jupiter 125: सध्याची किंमत ₹७७,००० वरून ₹७०,६६७ पर्यंत कमी होईल, म्हणजेच अंदाजे ₹६,३३३ चा फायदा मिळेल.
- Suzuki Access 125: सध्याची किंमत ₹७९,५०० वरून ₹७२,८८९ होईल, ज्यामुळे ग्राहकांना ₹६,६११ चा लाभ मिळेल.
- Hero Maestro Edge 125: सध्याची किंमत ₹७६,५०० वरून ₹७०,१११ पर्यंत खाली येईल, ज्यामुळे सुमारे ₹६,३८९ ची बचत होईल.
- TVS NTorq 125: सध्याची किंमत ₹८५,००० वरून ₹७७,७७८ होण्याची शक्यता आहे, म्हणजेच सुमारे ₹७,२२२ चा फायदा होईल.
याशिवाय, सुझुकी बर्गमन स्ट्रीट १२५, यामाहा फास्किनो १२५ आणि इतर अनेक मॉडेल्सच्या किमतीतही लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे नवीन दुचाकी घेण्याचा विचार करत असाल, तर २२ सप्टेंबरनंतरच्या नवीन किमती तपासणे फायदेशीर ठरेल.