Shani Gochar In Meen Rashi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनी ग्रहाला कर्म फळदाता आणि न्यायाचा कारक ग्रह मानले जाते. हा नवग्रहांमध्ये सर्वात कमी गतीने चालणारा ग्रह आहे, ज्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी साधारणतः अडीच वर्षांचा कालावधी लागतो.
शनीने २९ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजून ०१ मिनिटांनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश केला आहे, जो पुढील अडीच वर्ष म्हणजेच ३ जून २०२७ पर्यंत याच राशीत राहील. या राशी परिवर्तनामुळे काही राशींसाठी सुवर्णकाळ सुरू होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यवान राशी.
१. वृश्चिक रास
शनीचे हे राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. जीवनात खूप चांगले बदल पाहायला मिळतील आणि तुमचं मन धार्मिक कार्यात अधिक रमेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
२. कर्क रास
कर्क राशीच्या व्यक्तींना शनीच्या या बदलामुळे अनेक मोठे फायदे होतील. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीची संधी तयार होईल आणि समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.
३. मकर रास
मकर राशीच्या लोकांसाठी देखील शनीचे राशी परिवर्तन खूप खास असेल. या काळात कामामुळे अनेकदा दूरचे प्रवास करावे लागतील, जे फायदेशीर ठरतील. तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. महत्त्वाचे म्हणजे, या काळात तुम्ही तुमची जुनी कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल.
टीप: वरील लेख ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ही केवळ सामान्य माहिती आहे. तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर होणारा परिणाम तुमच्या कुंडलीतील इतर ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असेल.