Panjabrao Dakh Hawaman Andaj: हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार आहे. १५ सप्टेंबरपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात आलेली आहे, असा अंदाज आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात येत्या तीन दिवसांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाची स्थिती
- विदर्भ: गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांत अनेक नद्यांना पूर आला असून, काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
- इतर जिल्हे: कमी दाबाचा पट्टा ओडिशा आणि छत्तीसगडच्या दिशेने सरकत असल्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही मुसळधार पाऊस पडेल.
- शहरांसाठी अलर्ट:
- मुंबई आणि ठाणे: रविवार आणि सोमवारी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
- पुणे: पुढील चार दिवस हलक्या पावसाच्या सरी अपेक्षित आहेत.
- रायगड, रत्नागिरी: या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
- मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज पाहिला असता सोलापूर जिल्ह्यामध्ये ढगफुटी झालेली आहे. तसेच बीड जिल्हा पाहता बीड जिल्ह्यामध्ये आज दिवस रात्र अति मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला असून सध्या मुसळधार पाऊस देखील सुरू आहे तसेच मराठवाड्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केलेला आहे. आणि मराठवाड्यातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान देखील सध्या हवामान खात्याकडून करण्यात येत आहे.
- पश्चिम महाराष्ट्र मध्ये देखील सध्या पहिले असता अनेक नद्यांना पूर आल्याचे पाहायला मिळत आहे तसेच पुणे जिल्ह्यात देखील कालपासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने हवामान खात्याकडून पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
परतीचा मान्सून कसा ठरतो?
मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानमधील हवामानावर अवलंबून असतो. राजस्थानवर वातावरणाच्या खालच्या थरात जास्त दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास आणि सलग पाच दिवस हवामान कोरडे राहिल्यास मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे जाहीर केले जाते. यंदा नेहमीपेक्षा दोन दिवस आधीच हा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.