कापूस उत्पादक शेतकरी मोठे नुकसान होणार; सरकारचा मोठा निर्णय पहा अन्यथा..! Cotton Rate

Cotton Rate: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्याची स्थिती चिंताजनक आहे. सरकारने कापसावरील आयात शुल्क हटवण्याचा निर्णय आणि सीसीआय (भारतीय कापूस महामंडळ) कडून सुरू असलेल्या कमी दरातील विक्रीमुळे कापसाच्या बाजारभावावर मोठा दबाव आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सीसीआयच्या धोरणांचा दरांवर परिणाम

सीसीआयकडे सध्या सुमारे २४ लाख गाठी कापूस शिल्लक आहे. यापूर्वी, त्यांनी तब्बल ७६ लाख गाठींची विक्री केली आहे. आता शिल्लक असलेला कापूसही सीसीआय सप्टेंबर महिन्यात विकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे, बाजारात कापसाचा पुरवठा वाढून दरांवर दबाव कायम राहील, असा अंदाज कृषी अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

या’ जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर; जिल्ह्याची यादी पहा Crop Insurance List
‘या’ जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर; जिल्ह्याची यादी पहा Crop Insurance List

या वर्षी कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही, परिणामी सीसीआयची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आणि १०० लाख गाठींपर्यंत पोहोचली. आता आयात शुल्क हटवल्यानंतर सीसीआयने आपल्या कापूस विक्रीचे भाव प्रति खंडी २५०० रुपयांनी कमी केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भावावर नकारात्मक परिणाम होत आहे.

आयात शुल्क हटवण्याचे कारण

अमेरिका, जो भारताच्या कापड निर्यातीसाठी एक महत्त्वाचा बाजार आहे, त्याने भारतीय कापडावर ५०% आयात शुल्क लावले आहे. यामुळे भारताची कापड निर्यात अडचणीत आली आहे. देशाच्या एकूण कापड उत्पादनापैकी ७% आणि अमेरिकेला एकूण निर्यातीपैकी ३५% निर्यात होते, त्यामुळे अमेरिकेचे मार्केट भारतीय शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचे आहे.

मोफत शिलाई मशीन योजना; महिलांना १५,००० अनुदान, असा करा ऑनलाइन अर्ज! pm vishwakarma silai machine yojana
मोफत शिलाई मशीन योजना; महिलांना १५,००० अनुदान, असा करा ऑनलाइन अर्ज! pm vishwakarma silai machine yojana

या निर्यात संकटामुळे कापड उद्योगांनी सरकारकडे कापूस आयातीवरील ११% शुल्क हटवण्याची मागणी केली होती. सरकारने उद्योगांची ही मागणी मान्य करत १८ ऑगस्ट रोजी शुल्क काढण्याची अधिसूचना जारी केली, ज्याला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशात मात्र कापसाचे भाव कमी झाले आहेत.

सीसीआयची नवी खरेदी व्यवस्था

नव्या हंगामात कापूस खरेदी वाढू शकते हे लक्षात घेऊन सीसीआयने शेतकऱ्यांसाठी नवीन व्यवस्था आणली आहे. यानुसार:

सोन्याच्या दरात मोठी घसरण; आजचे 22 कॅरेट व 24 कॅरेट चे नवीन दर पहा Gold Silver Price
सोन्याच्या दरात मोठी घसरण; आजचे 22 कॅरेट व 24 कॅरेट चे नवीन दर पहा Gold Silver Price
  • कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची सोय करण्यात आली आहे.
  • शेतकरी आपल्या सोयीनुसार स्लॉट बुक करून कापूस विकू शकतात.
  • १५ ऑक्टोबरपासून देशभरात ५५० खरेदी केंद्रे सुरू केली जातील, त्यापैकी १५० केंद्रे एकट्या महाराष्ट्रात असतील.

सध्या कापसाचे भाव दबावातच राहण्याची शक्यता असल्याने, शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी सीसीआयच्या या व्यवस्थेचा लाभ घेण्याचे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.

Leave a Comment

error: कॉपी करता येत नाही ⚠️ शेअर करा 📲