PM Kisan Yojana Installment List : केंद्र सरकारची सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक असलेल्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’ अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६००० रुपये जमा केले जातात. हे पैसे प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. आता अनेक शेतकरी त्यांच्या 21 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. तुमचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला आहे की नाही, हे कसे तपासावे, याची सोपी आणि संपूर्ण माहिती येथे दिली आहे.
पैसे तपासण्याचे सोपे मार्ग
तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासण्याचे तीन मुख्य मार्ग आहेत:
- मोबाईल नंबरद्वारे स्टेटस तपासणे:
- सर्वात आधी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- ‘Farmers Corner’ मध्ये ‘Know Your Registration Number’ वर क्लिक करा.
- तुमचा आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर टाका, त्यानंतर कॅप्चा कोड आणि OTP टाका.
- आता तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल. हा नंबर पुढे स्टेटस तपासण्यासाठी वापरू शकता.
- लाभार्थ्यांची यादी तपासणे:
- पीएम किसानच्या वेबसाइटवर जाऊन ‘Farmers Corner’ मध्ये जा.
- ‘Beneficiary List’ या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि ग्रामपंचायत निवडा.
- यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही, तसेच तुमच्या वडिलांचे नाव आणि हप्त्याची स्थिती तपासा.
- रजिस्ट्रेशन नंबरद्वारे स्टेटस तपासणे:
- २० वा हप्ता कधी येणार?
- पीएम किसान योजनेचे पैसे दर ४ महिन्यांनी दिले जातात. ते एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या काळात जमा होतात. २० वा हप्ता जूनमध्ये येण्याची शक्यता होती, परंतु अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे हा हप्ता लवकरच जमा होईल, अशी अपेक्षा आहे